दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई, 24 जून : महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी या सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत.
त्यानुसार थेट एकनाथ शिंदे यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा प्लॅन पवारांनी बनवल्याचं समजतंय.
विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांच सभासदत्व रद्द झाल्यावर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संख्याबळाचं गणित बदलणार आहे. या बदललेल्या गणिताचा फायदा ठाकरे सरकारला करून देण्याची पवारांची योजना आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र बदलू शकतं, त्यामुळे त्यावर देखील आता महाविकास आघाडी सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नाही शिंदे समर्थक आमदारांवर कारवाई एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.