
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी-आपसिंग पाडवी
नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजने मार्फत गरोदर माता,स्तंदामाता,७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना अमृत आहार वाटप करण्यात येतो परंतु मागील तीन महिन्यांपासून जिह्यातील काही अंगणवाडी केंद्रांना पैसा नसल्याने व मागील दोन महिन्यांपासून उसनवारी पैसे घेऊन सेविकांनी आहार वाटप केला पण आता पुढे ही उसनवारी वाढत असल्याने व सेविकांचे मानधन ही नियमित नसल्याने १ जुलै पासून आहार वाटप बंद करणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे कार्याध्यक्ष युवराज बैसाने यांनी मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिले आहे.जिल्ह्यातील अक्कलकुवा -धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंनत अडचणीचा सामना करत प्रामाणिक काम करत आलेली आहे.परंतु अमृत आहार योजनेची रक्कम बँक खात्यात तीन महिन्या पासून टाकण्यात आलेली नाही व मानधन ही गेल्या दोन महिण्यापासून देण्यात आलेले नसून अंगणवाडी सेविकेला अमृत आहार योजना वाटप करण्या करिता प्रकल्प कार्यालयातून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने अंगणवाडी सेविका आहार योजना साठी सद्या पदरचे खर्च करत असून अमृत आहार योजने साठी दररोज कोठून पैसे आणायचे असा प्रश्न तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला पडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांवर अमृत आहार योजना कर्मचऱ्यांना नियमित मानधन नसतांना उसनवारी पैसे घेऊन आहार नियमित वाटप सुरू असून ही एका बाजूला मा.जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कडून आहार तपासणी पथकाची नेमणूक केली जाते ही खेदाची गोष्ट असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी बाब असल्याचे पत्रात म्हटले आहे.
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे पैसे आठ दिवसात जमा न केल्यास दि.१ जुलै पासून आहार वाटप बंद करणार असून भविष्यात बालमृत्यू व कुपोषण वाढल्यास याची जबाबदारी शासनाची राहील असे सूचक पत्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिलेले आहे.