
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- येथील अभिनव चित्रकला महाविद्यालयातून कु. रिद्धिका रमेश कर्हाळे या विद्यार्थीने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. ऐटिडी प्रथम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.त तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, कार्यवाहक, सहकार्यवाहक, शिक्षक तसेच रिद्धिकाचे वडील श्री. रमेश कर्हाळे यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे, तसेच पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिथे सर्वजण कौतुक करत आहेत.