
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे / प्रतिनिधी : कै. मोहनलालजी नंदरामजी उणेचा यांच्या स्मरणार्थ वै. महादेव बोवा गेणुजी काळोखे ( मुकादम ) सांप्रदायिक दिंडी ( दिंडी क्र.29 रथामागे ) यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणी व औषधं उपचार करण्यात आले. या मोफत आरोग्य तपसणी चे आयोजन गुजर मेडिको यांच्या मार्फत श्री शशिकांत उणेचा, राजेंद्र उणेचा, जयश्री डाबी, भाग्यश्री डांगी यांनी केले. या आरोग्य तपासणी व उपचारासाठी तसेंच दिंडी मधील वारकरी यांच्या तपासणी साठी डॉ राजश्री लष्करे, डॉ भक्ती उणेचा, डॉ सयोगिता जाधव हे उपस्थित होते.
या सामाजिक कार्यासाठी सद्यवं अग्रेसर असलेले अजित भोसले, सुशील वाघ, मंजुश्री उणेचा, निहाल उणेचा, सुवर्णा उणेचा, वैदेही उणेचा, यज्ञ उणेचा, माऊली पिंजन, मीना पिंजन यांचा सक्रिय सहभाग होता.