
दैनिक चालू वार्ता कंधार लोहा विशेष प्रतिनिधी -ओंकार लव्हेकर
नायगाव बाजार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कार्यरत कृषी महाविद्यालय नायगाव बाजार येथील विद्यार्थ्यांचे कृषी विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी महाविद्यालय नायगाव बाजार मौजे कोकलेगाव येथे ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम (रावे )पार पाडण्यात आला. यामध्ये कृषी सलग्न विविध उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषिदूत विद्यार्थी देत आहेत. या उपक्रमा अंतर्गत माती परीक्षण बीज उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया योग दिवस इत्यादी असे शेती विषयक तसेच सामाजिक उपक्रम पार पाडण्यात आले यावेळी मौजे कोकलेगाव येथील सरपंच वंदनाताई मिरकुटे मॅडम व अन्य सदस्य आणि शेतकरी बांधव यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
हे उपक्रम राबवत असताना कृषी महाविद्यालय नायगाव बाजार व नायगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण सर, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर .जी .नादरे सर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस जी नागणी कर सर, व कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. ए .शेंडगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
हे उपक्रम कृषी दूत विद्यार्थी कौशिक जोशी, करण इंगळे, विशाल जाधव, सुमित किन्हाळकर, निलेश हातगले , विश्वनाथ कल्याण, रेणुकादास कराळे आदि कृषी दुतांनी आपला सहभाग नोंदवला.