दै चालु वार्ता वृत्तसेवा
ठाणे, 16, ऑक्टोबर: उल्हासनगर व ठाणे जिल्ह्यातील चित्रपट निर्माता युवा उद्योजक यांचे लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारताच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी एकमताने जाहीर निवड करण्यात आली आहे. गेली तीन वर्ष चित्रपट क्षेत्रात कलाकारांच्या हिताचे प्रश्न ही संघटना सोडवत आहे. श्री राजू पटेकर यांची निवड झाल्यामुळे उल्हासनगर- मुंबई आणि ठाणे मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या खांद्यावर लोकस्वराज्यने जबाबदारी दिल्याने त्यांच्या कामाचे पोचपावती श्री राजू पाटेकर यांना भेटली आहे.
कलाकारांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण भारतभर लोकस्वराज्य काम करत आहे. यावेळी उपस्थित सर्व राष्ट्रीय कमिटीचे पदाधिकारी संस्थापक अभिजीत खेरे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत खानविलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष जयश्री निकम, राष्ट्रीय सचिव शेखर जाधव, राष्ट्रीय खजिनदार संकेत बांदेकर, तसेच महाराष्ट्र अध्यक्ष समीर सय्यद, महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल गवई, तक्रार निवारण प्रमुख विक्रांत देशमुख, महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रसाद राव, महाराष्ट्र सचिव भरत कीर्तने, महाराष्ट्र समन्वयक प्रमुख शेखर आहिरे, ठाणे जिल्हा समन्वयक प्रमुख महेश दवंडे, व मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.