दैनिक चालू वार्ता,कंधार (ओंकार लव्हेकर )
कंधार : भारतीय जीवन विमा निगम शाखा सिडको अंतर्गत लोहा येथील कार्यालयामध्ये नुकताच लोहा येथील सातव्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट व यशस्वी विमा प्रतिनिधींचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अतिशय उत्कृष्ट आपल्या भाषणामध्ये व अभ्यासू असणारे नांदेड डिव्हिजन चे मार्केटिंग मॅनेजर एस आर राठोडकर सर यांनी उपस्थित असणाऱ्या विमा प्रतिनिधींना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले .याप्रसंगी ते बोलत असताना म्हणाले विमा प्रतिनिधी हा एल.आय.सी चा कणाआहे. त्याने काम केले तरच त्याला व एल.आय.सी ला दोघांनाही उत्पन्न होईल .
पण हे काम केव्हा होईल जेव्हा विमा प्रतिनिधी च्या मनात आले तरच अगर मनात नाही आले तर काम कसे होणार असे बहुमूल्य
उद्गार त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी टी.रामचंदर(मॅनेजर सेल्स), जी.प्रसाद(सीनियर बी.एम.), के .आनंद (ब्रांच मॅनेजर, लोहा), विकास अधिकारी म्हणून विजय गलांडे ,हंसराज पाटील, उत्तम शिंदे, प्रसन्ना देसाई ज्ञानेश्वर गोवंदे, गजानन जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यापुढे एस .आर .राठोडकर सर म्हणाले ,अंगामध्ये जिद्द ,करण्याची मनातून इच्छा, तळमळ असेल तरच यश प्राप्त होईल .आम्ही कितीही सांगितले किंवा कोणी वरिष्ठांनी मार्गदर्शन जरी केले. तरी त्याचा काही उपयोग होणार नाही किंवा तुम्ही उच्च दर्जाची ट्रेनिंग जरी केली .तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपल्या मनात आल्याशिवाय आपल्या जीवनात बदल होऊ शकत नाही म्हणून आपले जीवन बदलणे हे केवळ आपल्या हातात आहे .याचा दिशादर्शक हात दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःचा होत .स्वतःचे आयुष्य हे स्वतः घडू शकतो. असे बहुमुल्य मार्गदर्शन करून त्यांनी आपल्या गोड व मधुर वाणीने विमा प्रतिनधी यांचे मन आकर्षित केले.
याप्रसंगी पंढरी जाधव ,सुभाष राठोड ,बाबू राठोड ,देविदास राठोड, चंद्रकांत मामडे, सचिन परभणीकर ,शंकर पवार ,लक्ष्मण डांगे ,राम कांबळे ,हनुमंत कागणे , गणेश बुद्रुक,उद्धव पुंडे ,शेख अखिल, तुळशीराम विश्वासराव, अशोक पेडगुलवार, भानुदास थोटे,मुरलीधर येवले सहित अनेक जण उपस्थित होते.