दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे : धनकवडी येथील शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ईश्वरलाल खोपडे तर उपाध्यक्षपदी संगीता पांडुरंग मरगजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या धनकवडी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वांनुते हा ठराव मंजूर करण्यात आला.
संगीता मरगजे या पतसंस्थेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा म्हणून काम पाहणार असल्याने उपस्थित संचालक आणि सभासदांनी त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
शहरासह दक्षिण उपनगरात सर्वसामान्य जनतेची आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी अग्रणी असलेल्या शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना डिसेंबर २००२ मध्ये झाली असून सभासद संख्या १३५६ आहे. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथराव धाडवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेला मागील वीस वर्षां पासून सतत ‘अ’ आॅडिट वर्ग मिळत आला आहे.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष काशीनाथ धाडवे पाटील, ज्येष्ठ संचालक गोविंदराव थोपटे, माजी अध्यक्ष शिवाजीराव सांळुके, माजी उपाध्यक्ष राजेंद्र धोत्रे, संचालक प्रा. बाजीराव गायकवाड, दिलीप निकम, बबनराव बोबडे, गोपाळ भिलारे, शिवाजी चव्हाण व व्यवस्थापिका हेमलता तुपे उपस्थित होते.