
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालय तळाचे राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, पी डब्ल्यू डी चे अधिकारी, प्रांत अधिकारी दिघावकर, तहसीलदार अन्नपा कनशेट्टी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदिप इंगोले, तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्व नगरसेवक व नगरसेविका, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाना भौड, मंगेश देशमुख, बबन चाचले, शिवसेना नेते लिलाधर खातू, तळा व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तळा येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटा, ४ डॉक्टर व २६ कर्मचारी व कामगार कार्यरत असणार आहेत या सर्व कर्मचाऱ्यांची आठ दिवसांत भरती केली जाणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
२००९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी भूमिपूजन केलेल्या रुग्णालयाचे आज माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे याचा आनंद होत असल्याची भावना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
या ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शन रूम, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, केस पेपर रुम, औषध वितरण रूम, अपघात कक्ष, वार्ड क्रमांक १ (पुरुष), वार्ड क्रमांक २ (स्त्री), अतिदक्षता विभाग, रक्तपेढी कक्ष, प्रयोगशाळा, इ सी जी रूम, सभागृह, संगणक कक्ष, एच आय व्ही रूम, आस्थापना १, आस्थापना २, शस्त्रक्रिया गृह, भांडार, रिकव्हरी रूम, स्वच्छता गृह पुरुष व स्त्री असे वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले आहेत. हे रुग्णालय गरीब व गरजू रुग्णांना एक आधार असणार आहे त्यामुळे तळा शहर व परिसरातील नागरिकांनी या रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत असे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी आवाहन केले आहे.
या उद्घाटना प्रसंगी तळा परिसरातील नागरिक, व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.