
दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
जनतेला फसवून सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने जाता जाता ही जनतेला फसवले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यायचे जाहीर केले होते.परंतु यामधून 2019 साली आलेल्या महापुरातून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे. याशिवायही अनेक जाचक अटी घातलेले आहेत. याविरोधात आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर जय शिवराय संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या आठवड्यात सरकारने या जाचक अटी मागे घेतल्या नाही तर सर्व शेतकऱ्यांना घेऊन हातकणंगले येथे सोमवार दिनांक चार जुलै रोजी कोल्हापूर- सांगली रास्ता रोको करण्याचा इशारा जय शिवराय शेतकरी संघटनाचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी काका, उत्तम पाटील तात्या, गब्बर पाटील, शितल कांबळे, पुंडलिक बिरांजे, नामदेव साळुंखे, रामदास वड्ड, विजय पाटील, बजरंग अवघडे यांच्यासह भागातून आलेले शेतकरीवर्ग उपस्थित होते..