
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये औद्योगिक वसाहती परिसरामध्ये दुचाकी चालकाला लिफ्ट मागण्यांचा बहाणा करीत त्याला बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व पंधरा हजार रुपये किमतीचा जबरदस्तीने मोबाईल चोरुन नेवुन त्याला कॅनाल मध्ये ढकलून पळून गेलेल्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी शिताफीने दोघांना अटक केली. (विक्रम विनायक उंबरे २८ व किशोर साई राम जाधव वय २७ दोघेही रा. कोडोली सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्राकडूंन मिळालेल्या माहितीवरुन दि.२३ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारांस सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या गेटसमोर अमोल बाळकृष्ण जगताप रा. गोळीबार मैदान सातारा कोडोली यांच्याकडूंन अनोळखी इसमांनी पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल ,रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण केली या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यांत दाखल झाली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सदर गुन्ह्याचा शोध लावून संशयितांना अटक करण्यांच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पथकांला केल्या सदर गुन्ह्यांचा तपास सुरु असताच गोपनीय माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करुन दोघांना शिताफीने ताब्यांत घेवुन त्यांना पोलीस ठाण्यांत आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आणि एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत त्याच्याकडूंन गुन्ह्यांत वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यांत आली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे ,सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्यासह ज्योतिराम पवार, सुजित भोसले, पकंज ठाणे, अविनाश चव्हाण, अभय भोसले, गणेश घाडगे ,विक्रम माने संतोष कचरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.