
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
व्हि.पी. संगीत अँकँडेमीच्या माध्यमातून विवेक पांडे करणार जागतिक विक्रम
——————————————————————————–
पुणे– येथील व्हीपी म्युझिक अकादमीच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “सलाम बॉलिवूडच्या दिग्गजांना.!” या सुमधूर संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात १ जुलै रोजी सकाळी ११ ते रात्री १२.३० पर्यंत करण्यात आले आले असून या माध्यमातून व्हीपी म्युझिक अकादमीचे गायक -कलाकार सलग तेरा तास आपली कला सादर करून जागतिक विक्रम करणार आहेत.
बॉलीवूडचा १०० वर्षांचा प्रवास संगीताच्या माध्यमातून प्रथमच उलगडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट सृष्टीतील १९३८ ते २०२२ पर्यंतच्या १३० विख्यात पार्श्वगायकांच्या गायकीला आपल्या आदाकारीने अकादमीचे गायक -कलाकार उजाळा देणार असून हे कलाकार इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, आँस्ट्रेलियासह आशिया व युरोप खंडामध्ये ‘न भूतो न भविष्यति’ अशी सलग तेरा तास आपली कला सादर करून जागतिक विक्रम करणार आहेत तर त्याची नोंद वर्ल्ड बूक आँफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याचे कार्यक्रमाचे संकल्पनाकार विवेक पांडे यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना या कार्यक्रमाचे संकल्पनाकार विवेक पांडे यांनी सांगितले कि,”सतत दोन वर्षे असणारे कोरोनाचे सावट संपले असले तरी कोरोनामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला तणाव पुरेसा निवळलेला नाही. परंतु ‘सलाम बॉलिवूडच्या दिग्गजांना!’ या संगीत कार्यक्रमामामुळे श्रोते तणावमुक्त तर होतीलच परंतु त्यांना एक वेगळी आनंददायी ऊर्जासुद्वा नक्कीच मिळेल.
या कार्यक्रमाची संकल्पना विवेक पांडे यांची असून संगीतकार सईद खान, अमन सय्यद, असिफ खान, नितीन शिंदे आपली कला सादर करणार आहेत तर त्यांना अयान मोमीन (ध्वनी योजना) , विजय चेन्नूर (प्रकाश योजना) यांची साथ लाभणार आहे. तर शोभा कुलकर्णी आपल्या उत्कंठावर्धक सुत्रसंचलनाने श्रोत्यांना संगीत विश्वाची सफर घडवणार आहेत