
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
उदयगिरी मल्टीस्पेशलिटी व आॕक्सिडेंट हॉस्पिटलचे संस्थापक संचालक तथा प्रसिध्द लेप्रोस्पिक सर्जनतज्ञ डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांचा त्यांनी सर्व सामान्य गोरगरिब, दिन-दलित, पददलित आठरापगड जातीधर्मातील हजोरो महिलांची निशुल्क व मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, पोटातील विविध विकारांवर, मृत्रविकार, मुत्तखडा, अँपेडेक्स, कँन्सरवर तातडीने करावी लागणारी शस्त्रक्रिया केली. तसेच अंडावृध्दी, हार्निया, हाड्रोसिल रूग्णांची अल्पदरात व नि:शुल्क, मोफत केली. याची दखल घेत अतनुरातील लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस, आॕल इंडिया मराठा आॕरगान्सेस संघटना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर यांच्या संयुक्त विधेमाने आज दि.१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी चौकातील सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात कोरोना योध्दा पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉक्टर डे दिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. असे संस्थेचे प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, शिवसेनेचे जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, शिवसेना व युवासेनेचे जळकोट तालुकासमन्वयक मुक्तेश्वर येवरे-पाटील, कामगार काँग्रेसचे जळकोट तालुकाअध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, मराठा संघटनेचे अविनाश शिंदे यांनी सांगितले.