
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-सविस्तर वृत्त असे की 2019 साली डोंजा ता. परंडा येथे फिर्यादी कल्याण घोगरे यांना शेतात माती टाकण्याच्या कारणावरून आरोपी भाऊसाहेब घोगरे, यशवंत घोगरे आणि बबलू घोगरे यांनी लाथा बुक्यांनी, काठीने मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने भाऊसाहेब घोगरे यांनी फिर्यादीच्या पोटात सूरी मारली म्हणून वरील आरोपीं विरुद्ध परंडा पोलीस स्टेशनमध्ये कलम 307,323,504, सह 34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी बबलू घोगरे याचे विरुद्ध ठोस पुरावा नसल्यामुळे तपासमध्ये त्याचे नाव कमी करून दोघा जणांविरुद्ध परंडा पोलिसांनी तपास पूर्ण करून भूम न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात केले होते. सदरील प्रकरणाची सुनावणी भूम येथील सत्र न्यायाधीश श्री. एस. आर. उगले साहेब यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. आरोपीच्या वतीने अॅड. सिराज मोगल यांनी केलेला युक्तिवाद आणि केलेला बचाव गृहीत धरून भूम येथील सत्र न्यायालयाने आरोपी भाऊसाहेब घोगरे आणि यशवंत घोगरे यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड.सिराज मोगल यांनी काम पाहिले तर त्यांना अॅड.सोहेल शेख, अॅड. तोफिक शेख, अॅड.सतीश कालवटकर, अॅड.किशोर डोंबाळे आणि अॅड. हुसेन सय्यद यांनी सहकार्य केले.