दैनिक चालू वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी आप्पासाहेब चव्हाण
बर्दापूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सात उपकेंद्र असून यावर 70 हजार लोकसंख्येच्या आरोग्याचा भार या केंद्रावर आहे. येथील केंद्राच्या इमारतीला पावसात गळती लागते, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेली निवासस्थाने पडली आहेत यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 1987 साली निवासस्थाने बांधली होती. ती आता जीर्ण झाली असून त्यात राहता येत नाही. सर्व बाजूंची संरक्षण भिंत पडून गेली आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त पदे असल्याने अडचणी होत आहेत. यात मंजूर पदात स्टाफ नर्स एक आहे तेही रिक्तच आहे. बर्दापुर उपकेंद्र आरोग्य सहाय्यक स्त्री पद रिक्त, जवळगाव उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी स्त्री पद रिक्त, सुगाव उपकेंद्र आरोग्य सेवक पुरूष पद रिक्तच. येथील सेवक एकूण मंजूर 5 पदांपैकी 4 पदे रिक्त आहेत. येथे रुग्णांना ये -जा करण्यासाठीची रुग्णवाहिका सतरा वर्षे जुनी असून मोडकळीस आलेली आहे.
“मी वरिष्ठांना रुग्णवाहिका विषयी माहिती दिली आहे. आहे त्या मनुष्यबळावर रुग्णांवर उपचार करणे चालू आहे.”असे डॉ. राहुल हाडबे, वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
Related Stories
October 27, 2021
October 27, 2021