दैनिक चालू वार्ता मरखेल प्रतिनिधी- एकनाथ गाडीवान
देगलूर तालुक्यातील देवापूर येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित म्हणून देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ आंतापुरकर यांच्या उपस्थिती म्हणुन त्यांचे मातोश्री श्रीमती शितलताई अंतापुरकर मॅडम उपस्थित होते त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करण्यात आले. सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अभिवादन करून त्या नंतर ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचलन गाडीवान एकनाथ यांनी केले. व त्यानंतर गावातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढविले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फुगारे सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले त्यानंतर सुरेश सोनकांबळे व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मातोश्री श्रीमती शितलताई अंतापुरकर मॅडम यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या जीवनातील प्रसंग व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रभाव मोलाचे होते .अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर जयंती मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आले चित्रकला,दोरी,संगीत खुर्ची लांब उडी,तळयात मळयात असे अनेक प्रकारचे स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . कार्यक्रमास उपस्थित गावातील नागरिक जयंती मंडळाचे अध्यक्ष गुडेंराव गाडीवान,उपाध्यक्ष गंगाधर गाडीवान, सचिव धर्माजी गाडीवान, कोषाध्यक्ष संतोष गाडीवान,ग्रामसेवक नाइनवाड, सर ,व जिल्हा प.पा.शा.शाळा मु.अ. वाकडे सर शिंदे सर शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शेख अहमदसाब ,सरपंच रामलू नेरलावार ,चेअरमन अशोक पाटील, पोलीस निरीक्षक कदम सर व वाघमारे सर भीम मिञ मंडळ,गावातील नागरिक विद्यार्थी मिञ व महिला मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते .