दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरात राजकारणाच्या बाजूस मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया च्या शेजारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर अतिशय अरुंद रस्ता असून सुद्धा बँकेत ये जा करणाऱ्या ग्राहकांच्या मोटरसायकल तथा इतर वाहने बँकेसमोरील अरुंद रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने लावली जात असून रस्त्याच्या बाजूलाच यशवंत स्टील होम चे भांड्याच्या दुकाना शेजारीच रस्त्यावरच पाच-पन्नास बाइक्स लावल्या जात आहेत त्यामुळे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राथमिक शाळेपासून जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवास प्रवेश करण्यासाठी अतिशय कसोटीचे प्रयत्न करावे लागत आहेत लहान लहान मुले असल्यामुळे एखाद्या मुलांच्या अंगावर गाडी वगैरे पडल्यास काही अनुचित प्रकार घडू शकतो त्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह महाराष्ट्र ग्रामीण बँके समोरील वाहने इतरत्र हलविण्याची व्यवस्था यशवंत स्टील होम च्या संचालकांनी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील बँक व्यवस्थापकांनी करावी ही पालकांची मागणी आहे.
एखाद्या मुलास चिमुकल्यास गाडी अंगावर पडल्यामुळे किंवा एखाद्या गाडीचे गरम झालेले सायलेन्सर पोळल्यामुळे काही दुखापत वगैरे झाल्यास यास जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे त्यासाठी पालकांनी दैनिक चालू वार्ता च्या नांदेड प्रतिनिधीकडे अशा प्रकारची मागणी केली आहे दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तरोडा असे आव्हान करीत आहे की उद्यापासून बँकेसमोरील वाहने इतरत्र लावण्याची व्यवस्था आपण करावी अन्यथा लहान मुलास काही इजा पोहोचल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे आव्हान करण्यात आले आहे.