दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथे शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला शे.का.प.चा 75 व्या वर्धापन दिनानिमित्ताने कंधार चे माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांनी शेतकरी कामगार पक्षांचा आजवरचा इतिहास व पक्षाची एकंदरीत आज वरची वाटचाल याविषयी परिपूर्ण माहिती जनतेसमोर मांडली. तसेच शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास जनतेसमोर मांडत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांची वय 102 वर्षे पूर्ण झाले असून त्यांचा शतकोत्सव महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे असे सन्माननीय माजी खासदार तथा आमदार भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांचा विजय असो, लाल बावटा जिंदाबाद , शेतकरी कामगार पक्ष जिंदाबाद अशा अनेक घोषणा/ नारे सुद्धा देण्यात आल्या तसेच कंधारचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित आहेत हेही सांगण्यास ते विसरले नाहीत एवढेच नव्हे तर सूत्रसंचालन करणारे माजी सरपंच माधवरावजी पेठकर यांनी भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांचा विजय असो व जिंदाबाद , जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
या शेतकरी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्ताने बहादरपुरा नगरीचे माजी उपसरपंच पंडित विठ्ठलराव पेटकर तसेच माजी उपसरपंच उत्तमराव गोविंदराव भांगे सद्गुरु आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जी. डी. जाधव ग्रामपंचायत सदस्य शंकरराव खरात , बाबुराव आईनवाड, सेवानिवृत्त शिक्षक परशुराम धोंडगे सर , ग्रंथपाल संजय येमेकर , बळीराम पेटकर , बळीराम कुरुडे , सौ. दिनकर मॅडम , सौ. राऊत मॅडम ,सौ. पोकले मॅडम , सद्गुरु आश्रम शाळेच्या अधिक्षिका सौ. आडे मॅडम व सहशिक्षिका सारंगधर मॅडम व सर्व स्टाफ तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच माधवरावजी पेटकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्रदीप इंदुरकर तसेच निलेश गायकवाड यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीताने झाली आणि समारोप राष्ट्रगीताने झाला.