दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
चंद्रपूर जिल्हातील मोरवा या गावी मंगेश गोखरे यांनी मेडिकल सुरु केले आहे. दि. ०१ ऑगस्ट रोजी त्यांचा मंगेश मेडिकल स्टोर चा लोकार्पण सोहळा माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचा हस्ते पार पडला. मोरवा गावात मेडिकल नसल्यामुळे गावातील नागरिकांना इतरत्र जावे लागत आहे. त्याअर्थी युवा मंगेश गोखरे यांनी शोभाताई पिदुरकर माजी पंस सदस्य यांचा मार्गदर्शनात मेडिकल सुरु करण्याचे ठरविले होते.
लोकार्पण सोहळा प्रसंगी महादेव पिदुरकर, नानाजी थेरे, शंकर खांडारकर, नरेंद्र डोर्लीकर, कांताबाई खोब्रागडे, भूषण पिदुरकर व वसंता घोडके, सत्यधामा टिपरे यांचा उपस्थितीत सदर सोहळा पार पडला.