दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
ग्रामीण भागात अभिनव उपक्रम
जव्हार:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून जव्हार तालुक्यातील पन्नास शाळांमध्ये मोफत वह्या वाटप करून ग्रामीण आदिवासी मागास मुलांनी शिक्षणासाठी पुढे येऊन या मुलांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे या उद्देशाने शैक्षणिक साहित्य देण्यात आले.जिजाऊच्या या मदतीमुळे ग्रामीण आणि दुर्गम अशा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होऊन पालकांना शैक्षणिक साहित्यासाठी होणार खर्च कमी होऊन मुले आवडीने शाळेत जातील अशी भावना व्यक्त केली जात आहे.
जिजाऊच्या या अभिनव उपक्रमात दहा हजार वह्यांचे मोफत वाटप करण्याचे उद्दिष्ट असून तालुक्यातील ५० जि.प.शाळांमध्ये जवळपास ३२२३ विद्यार्थ्यांना १०९१६ वह्यांचे वाटप आतापर्यंत पूर्ण झाले आहे.त्याच प्रमाणे घिवंडा ग्रामपंचायत हद्दीतील खोरीपाडा येथे संस्थे मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ६८ रुग्णांची आरोग्य तपासणी,४० रुग्णांची नेत्र तपासणी करून ३५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करून त्यातील ११ रुग्णांना शास्त्रक्रियेसाठी तर एका रुग्णाला जनरल शास्त्रक्रियेकरिता दवाखान्यात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख मधुकर पवार यांनी दिली.
या मोफत वह्या वाटपा प्रसंगी जिजाऊचे पालघर जिल्हाप्रमुख रवींद्र खुताडे,जव्हार तालुका प्रमुख मधुकर पवार,विलास पवार आणि जव्हार तालुका जिजाऊची पूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती.