दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : मुख्य रस्त्यावर असलेल्या क्षेत्रीय कार्यालच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मागील पाच वर्षात प्रभागाच्या अवतीभवतीच्या भिंती रंगविण्यापेक्षा क्षेत्रीय कार्यालयाची स्वत:ची इमारत उभी करता आली असती. चेंबर्सचे झाकण, खड्डयांची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती, वीजेच्या खांबाला करंट लागणे आहे, ड्रेनेज, कचरा, पाणी, स्वच्छता, प्रभागातील शाळांची दुरवस्था वारंवार तक्रारी करुनही अधिकारी दाद देत नाहीत, कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतात अशा अनेक तक्रारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी केल्या.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त वैभव कडलख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. यावेळी अनेक सदस्यांनी तक्रारी
मांडल्या. प्रभागातील पालिकेच्या शाळांमध्ये मुलभुत सुविधा नसणे, ऑडिट नसणे यावर कमिटीच्या सदस्यांनी आपले तीव्र मत मांडले. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ७५ समाजमंदिरे आहेत त्यातील फक्त ३ क्षेत्रीय कार्यालयाच्या ताब्यात आहेत. बाकीच्यांवर माननीयांचा कब्जा आहे.