दैनिक चालु वार्ता /
प्रतिनिधी माकणी /
गणेश विठ्ठलराव मुसांडे : –
लोहारा: तालुक्यातील माकणी
येथील भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ङ्कहिंदी दिवस समारोहङ्क या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. एम. ए. येल्लूरे यांनी याप्रसंगी संपर्क भाषा म्हणून हिंदी भाषेचे भारतातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान व महत्त्व अधोरेखित केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदी भाषेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आर.एम. खराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ए. एम. गाडेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.