दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- शिवराज पाटील
रुई,तालुका कंधार येथील महात्मा बसवेश्वर् माध्यमिक विद्यालयात् भारतीय स्वातंत्र्याचा आम्रत महत्सवी वर्ष अतिशय उत्सहात साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढून सुशोभीत करण्यात आले होते.सर्व विद्यार्थि गणवेश्यात उपस्तीथ होते.तर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ,पालक व माजी विद्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या लेझीम पथकांनी देशरंगीला या गाण्यावर सुंदर लेझीम नृत्य सादर केले.तर स्काऊंट पथकांनी सुंदर संचलन सादर केले.नंतर गावातील सरपंच व इतर मन्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील एस.एस.यांनी केले.ध्वजारोहणा नंतर गावातील मुख्य रस्त्याने लेझीम पथक, स्काऊंट पथक व गणवेषातील विध्यार्ती हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रभातफेरी काढ्यान्यात आली.व नंतर शाळेत विधार्त्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.या साठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.