दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील माजी सैनिक माधव सोनवळे यांची(माजी सैनिक विकास समिती) संघटनेच्या लोहा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. माजी सैनिक माधव सोनवळे यांना नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष बालाजी रामाप्रसाद चुकलवाड यांच्या स्वाक्षरी ने देण्यात आले आहे.संघटनेच्या पद निवडी संदर्भात अटी,नियमांचे अधिन राहुन कार्य करण्याचे सदरिल नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.
माजी सैनिक माधव सोनवळे यांच्या माजी सैनिक संघटनेच्या (माजी सैनिक विकास समिती)लोहा शहराध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल लोहा शहर, तालुका, जिल्हा भरातील माजी सैनिक,सर्व मित्र मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.