दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा नगर परिषद कार्यालयात आझादी का अमृत महोत्सव १५ आॅगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत सामुदायिक रीत्या राष्ट्रगित घेतले.
यावेळी मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक शरद पाटील पवार, गटनेते करीम शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक केतन खिल्लारे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, यांच्या सह सर्व कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व्यापारी, सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक आदी उपस्थित होते.
तसेच आझादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत लोहा शहरात हर घर तिरंगा अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन दि.१३ ते १५ आॅगस्ट दरम्यान लोहा शहरातील नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवून न.पा.ला सहकार्य केले व अभियान यशस्वी केले.