दैनिक चालु वार्ता सुधागड प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात क्षणभर विश्रांती ही संस्था गेली बरीच वर्षे आदिवासी गावात शैक्षणिक कार्यक्रम,आश्रमशाळेत मुलांसाठी धान्यवाटप,तर आदिवासी गावक-यांसाठी मदत असे उपक्रम आयोजित करत असते.त्याच अनुषंगाने क्षणभर विश्रांती या सामाजिक संस्थेने मु.पो.चिवे,ता.सुधागड,जि.रायगड येथील शिक्षण महर्षि दादासाहेब लिमये आश्रमशाळेत नुकताच आंघोळीचे साबण,शैक्षणिकपाट्या,बिस्कीट,खोबरेलतेल,बॅडेज,टुथपेस्ट-टुथब्रश,कपडे इत्यादी वस्तुंचे वाटप करण्यात आले. मुलांच्या मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध “जादुगर अभिजीत”यांचे जादुचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते.अभिजीत सर यांनी अत्यल्प दरात या मुलांसाठी वेळात वेळ काढून मुलांचे मनोरंजन केले.क्षणभर विश्रांतींच्या या उपक्रमासाठी नेहमी तत्परतेने उपलब्ध होणा-या अभिजीत सरांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.”क्षणभर विश्रांतीच्या”या उपक्रमाला सभासदांनी वस्तुरुपी,आर्थिक मदत करणा-या सर्वांचे आभार मानण्यात आले.समाजसेवेत पर्यायाने देशातल्या कुणासाठी काही तरी केलेय हे आत्मिक समाधान सर्वांना मिळाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी “क्षणभर विश्रांती”या संस्थेच पदाधिकारी,ग्रुप सदस्यांची वस्तुरुपी तसेच देणगी स्वरुपात बहुमुल्य साथ लाभली,त्या सर्वांचे आभार मानण्यात आले.