दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
स्व.माजी आमदार यांच्या जेष्ठ सुपुत्र यांना सहपत्नीक मिळाला ध्वजारोहणाचा मान
——————————————
अमरावती :-भारताला पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी कुटुंबाची व स्वतःची शहिद शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देत देशाला स्वातंत्र मिळवून दिलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याची आठवण जिवंत ठेवण्याकरिता कापुसतळणी येथे प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी ग्रामपंचायतच्या इमारतीवर ७५ ध्वजाची उभारणी करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.
कापूसतळणी येथे सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध पक्षीमित्र यांनी स्वतःच्या कल्पनेतून बांबू पासून ७५ ध्वज खांब तयार केले आणि ग्रामपंचायत इमारतीवर उभारले.यावेळी ७५ खांबावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्याचा मान उपस्थित मान्यवरांना मिळाला.त्यापैकी स्व.माजी आमदार शंकररावजी बोबडे यांचे जेष्ठ सुपुत्र विदर्भकुमार शं.बोबडे व स्वातंत्र संग्राम सैनिक माजी आमदार स्व.संपतराव भोपळे यांची नात सौ.वर्षा वि.बोबडे या बोबडे दांपत्यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला.
यावेळी कापूसतळणी गावातील स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे वंश,माजी सैनिक,कार्यरत सैनिक,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,सफाई कामगार,रोजगार हमी योजनेचे मजूर,विधवा महिला ईत्यादि क्षेत्रातील ७५ लोकांना या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातील ध्वज फडकविण्याचा मान देण्याकरिता ध्वजाची उभारणी केली असल्याची माहिती वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलतांना आयोजक अरुण शेवाणे यांनी सांगितले.या ऐतिहासिक ध्वज उभारणी करिता वीस हजार रुपये एवढा खर्च आला असून याची पूर्वतयारी पंधरा दिवसाच्या आधीपासून सुरू होती.या ध्वज उभारणी करिता ग्रामपंचायतचे सरपंचा कु.अक्षताताई खडसे व ग्राम विकास अधिकारी विजय कथलकर यांनी ग्रामपंचायतीच्या इमारतीवर ध्वज उभारणीची परवानगी दिली व योग्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अंजनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.विनोद खेडकर यांनी भेट दिली असता सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.ज्यामुळे तालुक्याचे नावलौकिक झाल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अरुण शेवाणे,प्रशांत सरदार,सुरेश महानकर,प्रदीप सातवटे,चेतन बाबनेकर,संजय हिंगे,प्रतीक मळसणे आदींनी अथक परिश्रम घेतले व स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव मोठया थाटात संपन्न झाला.