दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांतील श्री क्षेत्र. शिंगणापूर गावांमधील दशनाम गोसावी समाजाच्या काही समाध्यांचा जेसीबीच्या साह्यांने समाध्या उध्वस्त करण्यांत आल्या आहेत.तरी घटनेबाबत स्थानिक समाज बांधवांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्यांच्या धमक्या देवुन ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन कोणीही दखल घेत नाही अश्या परिस्थिती मध्ये सदरील घटना स्थानिक समाज बांधवांनी दशनाम गोसावी समाधी बचाव समितीला कळविले असता तातडीने समाधी बचाव समितीचे युवा प्रदेश किशोर भाऊ गोसावी, पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक गोसावी,प्रदेश सचिव आबासाहेब गोसावी घटनास्थळी दाखल झाले. समाज बांधवांना घेवुन स्थानिक दहिवडी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला. असून या प्रकरणी दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षांत घेता. श्री.क्षेत्र शिंगणापूर येथील गोसावी बांधवांचा गुन्हा दाखल करुन घेतला. याप्रकरणी आता श्री शेत्र येथील गोसावी बांधवांनी गावचे सरपंच तलाठी,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यांची मागणी आता गोसावी बांधवांकडूंन करण्यांत आली आहे. श्री.क्षेत्र शिंगणापूर येथील घटनेचे गांभीर्य घेता सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी त्वरित दूरध्वनीच्या माध्यमांतून श्री.क्षेत्र येथील गोसावी बांधव व दशनाम गोसावी समाज जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरी गोसावी यांच्याशी घटनेबाबत चर्चा केली.