
दै चालु वार्ता
रामेश्वर केरे
औरंगाबाद प्रतिनिधी – वाळूज येथील बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापकाचा मनमानी कारभाराला परिसरातील शेतकरी सुशिक्षित तरुण बेरोजगार हे वैतागले असून येथील शाखा व्यवस्थापकाची तात्काळ बदली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्राहकांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, बँक ऑफ बडोदा रिजनल व्यवस्थापक यांना देखील निवेदन दिले आहेत. या निवेदनात म्हटले आहे की मागील एक महिन्यापासून बँक ऑफ बडोदा वाळूज शाखेचा शाखा व्यवस्थापक ज्योती अरुणकुमार पासवान यांच्याकडून वाळूज शाखेच्या अंतर्गत असलेल्या खेड्यांमधील शेतकरी ग्राहकाची व सुशिक्षित बेरोजगारांची मोठ्या हेंडसाळ करत आहे. शेतकरी रोज चकरा मारुन देखील पिक कर्ज,इतर कामे होत नाही.तसेच ग्राहकांला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. शाखा व्यवस्थापक हे आपल्या मोबाईलवर सतत व्यस्त असतात. या शाखेतील ग्राहक येथील शाखा व्यवस्थापकाला अतिशय वैतागले असून तात्काळ या शाखा व्यवस्थापकांची बदली करावी नसता उपोषणाचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया-
मुख्य व्यवस्थापक बॅंक ऑफ बडोदा औरंगाबाद
रामवतार पालीवाल यांच्याशी याबाबत संपर्क साधला मिंटीगध्ये आहे नंतर संपर्क करतो म्हणून असे सांगितले.