
दै चालु वार्ता जालना
आकाश नामदेव माने
या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह राज्यातील पोलीस दल हादरून गेले होते.काल औरंगाबाद विभागाचे आयजी मालिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती. दरोड्याचा अवघ्या 24 तासात छडा लावल्यामुळे जालना पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे हे आरोपी बीड जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील आहे त्यांना अटक करण्यात गेवराई पोलिसांचे विशेष प्रयत्न आहे या दरोड्यात 3 कोटीच्या जवळपास सोनं दरोडेखोरानी नेलं अस समजते अवघ्या 24 तासात 2 सराईत आरोपी पकडण्यात पोलिसांना आलेले यश अभिनंदनिय आहे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र न्यूज चॅनलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पण या भागातील शेतकरी सर्वसामान्य माणूस ज्यांनी बँकेत लाखोचे सोने गहाण ठेवले ते ग्राहक सभ्रमावस्तेत आहे त्यांना आपले सोने कधी परत मिळेल, किती मिळेल याची मनात धाकधूकी आहे काहिचे म्हणणे आहे की सोनार व्हयल्युशन काढतांना मुळात कमी किंमत दाखवली जाते त्यात मजुरी चार्ज व इतर छुपा खर्च दाखवला जात नाही परिणामी परत मिळणारे सोनं आपलंच मिळेल का होत तेवढं मिळेल का या बद्दल येथील जनता साशंक आहे यांचे समाधान कोणी करत नाही तरी याबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे व जनतेचा संभ्रम दूर करावा या भागातील पत्रकार बंधूनी पण दरोडेखोर यांच्या बातम्याच्या पाठलाग करताना इतर जनतेच्या समस्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा या भागातील जनतेची आहे या बँकेत शहागड परिसरातील 50हुन अधिक गावच्या जास्तीत जास्त लोकांचे सोनं तारण आहे त्यामुळे परिसरातील जनता भयभीत व संभ्रमवस्तेत