
दै चालु वार्ता वृत्तसेवा
ठाणे : कोरोना काळात केलेल्या अमूल्य सामाजिक कार्याबद्दल त्याच प्रमाणे अतिवृष्टी मुळे पूरग्रस्त कुटुंबियांना मदत केलेल्या हातांना देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याच प्रमाणे कोरोना काळात रूग्णांची सेवा आणि प्रभागाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. यावेळी *देवदूत* पुरस्कार कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ भोईर ,के. व्ही. सामाजिक संस्थेचे हरेश गोगारी , ज्ञानोदय विद्यालयाचे संचालक आर.एन. तिवारी सर याना प्रदान करण्यात आला. याआधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माननीय श्री प्रमोद जी जाधव साहेब, सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर अमोल गीते सर, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अविनाश जाधव साहेब, तसेच आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील , डॉ. चित्रलेखा मेहता , प्रशांत पलांडे , रवींद्र मोरे , रंजना ऐंडे , किशोर शेरखाने , माया नाकडे , दीपक कांबळे , अतुल सरावने , प्रशांत तळवडेकर, सचिन सावंत , प्रशांत पवार , वाहन चालक मंजुळेकर , आरोग्य कर्मचारी रसिक मोरे , गीता बन्सी , मंजुळा पाटकर , सुमित दळवी , प्रतीक मोरे, केतकी गोसावी , अरुना महामुनकर, यांना *कोरोना योद्धा* पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीचे संचालक सिद्धार्थ जाधव , निवड समिती अध्यक्ष धीरज पार्सेकर , महिला अत्याचार समिती अध्यक्ष शोभना राजेश ओवाळ , यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे यांनी आयोजित केला होता.