दैनिक चालु वार्ता /
प्रतिनिधी निलंगा /
राहुल रोडे /
लातूर :- प्रत्येक भारतीयांचा अभिमान, स्वाभिमान असलेले देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या आज वाढदिवसानिमित्त निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लातूरच्या वतीने मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त ५ दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पुढील ५ दिवस शहरातील महिलांसाठी हे योग शिबीर खुले राहणार आहे.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष गुरुनाथ मगेजी, महिला मोर्चा अध्यक्ष मीनाताई भोसले, नगरसेविका जान्हवी ताई सूर्यवंशी, रत्नमाला ताई घोडके, शोभा ताई खोंडेकर, भाग्यश्री ताई, कीर्ती ताई, पंतजली योग केंद्र लातूर अध्यक्ष अमर घोरपडेजी यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थितीत होते.