दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना नांदेड जिल्हा सलग्न ता.लोहा येथील तालुका संघटनेची नुकतीच पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली असुन यात संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी आनंद पाटील गारोळे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुका उपाध्यक्षपदी विठलराव हाबगुंडे यांची फेर निवड करण्यात आली तसेच तालुका सचिव विलास किरवले यांची निवड करण्यात आली आहे तालुका कार्याध्यक्ष:-नागेश पाटील तालुका संपर्कप्रमुख:-संभाजी निलेवाड तालुका संघटक:-आम्रत पितळे ता.प्रसिध्दी प्रमुख:-संतोष राठोड तालुका तांत्रीक प्रमुख:-शिवराज टरके सोशल मीडिया प्रमुख:-संदीप धंदे सहसचिव:-अविनाश होळगे सहसंपर्कप्रमुख:-काळेश्वर देवडे ता.सल्लागार:-राजीव पा. उमरेकर ता.कोषाध्यक्ष:-जगदीश भाले ता.सहसंघटक:-शरद माळेगावे
वरील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व राज्य प्रसिध्दीप्रमुख संग्राम पा.डिकळे ,जिल्हा सहप्रसिध्दी प्रमुख सुनील जाधव ,आनंद गोडबोले जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व जिल्हा सचिव तुळशीराम बैनवाड यांची उपस्थिती होती.
येणाऱ्या काळात संगणक परिचालक संघटनेची कार्यप्रणाली तळागाळापर्यंत पोहचणार व जनसामान्यांनाची कामे तात्काळ सोडवली जाणार अशी प्रतिक्रिया संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख संग्राम पा डिकळे यांनी दिली.