दैनिक चालू वार्ता कंधार तालुका ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कौठा :- कंधार तालुक्यातील कौठा येथील सर्व गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला उपस्थित भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर, लोहा पंचायत समितीचे सभापती श्री. आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती श्री. नरेंद्र गायकवाड, पंचायत समिती सदस्या सौ. लक्ष्मीबाई देशमुख, आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर पांडे, उपसरपंच श्री. गंगाधर हात्ते, भारतीय सैन्य दलातील जवान श्री. सुधीर इंदोरे व श्री. रघुनाथ इंदोरे सदस्य रामदास कापसे,रामदास देशमुख, शंकर तंवडे,भुजंग देशमुख, बाबुराव वाघमारे, कपिल देशमुख सह गावातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.