दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
गेल्या 2 सप्टेंबर रोजी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पुतणे तथा विक्रांत दादा शिंदे यांचे बंधू ॲड.रविराज रावसाहेब पाटील शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. आणि युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी आहे.
मात्र हा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय विक्रांत दादा शिंदे यांनी घेतला आहे. शिंदे परिवारावर दुखवटा असल्याकारणाने ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. लोहा कंधार मतदारसंघातील सर्व जनतेस,कार्यकर्त्यांस, हितचिंतक,व नातेवाईक व मित्रपरिवारांस कळवण्यात येते की, आपण हारतुरे आणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नये. आपण सर्वजण आम्हा शिंदे कुटुंबीयांच्या सुखदुःखात सदैव सामील असता त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कायम ऋणी आहे. माझा अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार नाही, कृपया करून आपण सर्वांनी नोंद घ्यावी. मला भेटण्याचा किंवा शुभेच्छा देण्याचा कोणीही त्रास करून घेऊ नये, लोहा कंधार मतदार संघातील मायबाप जनता आमदार शामसुंदर शिंदे यांच्या परिवाराच्या सुख दुःखात सदैव सामील असल्याने मतदार संघातील सर्व मायबाप जनतेने या दुःखद प्रसंगीही आमच्या सोबत रहावे व मा़इया वाढदिवसानिमित्त कोणी हि आमच्या कार्यकर्त्यांकडून कोणतेही कार्यक्रम राबविण्यात येवू नयेत असे नम्र आवाहन युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांनी केले आहे.