दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- सणावारांची लगबग सुरू असतांना गणपती रोडवरील मेनपुरा येथे स्थानिक नागरिकांना शारीरिक दुखापतींना तोंड द्यावे लागतं आहे.सद्यस्थितीत गणपती उत्सव सुरू आहे आणि या रोडवरूनच अनंत चतुर्थीला गणपती मिरवणूक असल्यामुळे हजारो लोकांची ये-जा असते.नालीवरील काँगरीटीकरणाचे आवरण निघाल्यामुळे रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे.वाढीव घरपट्टी कर मात्र तात्काळ लागू करून तो नागरिकांकडून आवर्जून वसूल करतात असा प्रश्न स्थानिकांनी केला आणि अश्यातच ह्या रस्त्यावरील नालीला खड्डा की खड्डयात नाली?असा प्रश्न मेनपूरा येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे.परंतु अंजनगाव सुर्जी न.प.प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट बघत तर नाही ना? यावरून प्रशासन ह्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
तसेच जुना बस स्टॉपजवळ असलेल्या हिंदू स्मशानभूमीतील कंपाऊंड ग्रील चोरीला गेल्या होत्या.ह्या ग्रील चोरीच्या प्रकरणाचा तपास करून पूर्ववत कंपाऊंड ग्रील लावण्यात यावे यासाठी डिसेंबर २०२१ मद्धे निवेदन देण्यात आले होते मृतदेहावरचे लोणी खाणारे कोण?असा खडा सवाल सुद्धा केला होता परंतु त्याचे उत्तर न देता प्रलंबित प्रश्नांवर सुद्धा न.प.प्रशासन कुठलीही कारवाई केले नसल्याचे आढळले.