दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी हातकणंगले –
लोककलावंत सास्कृंतिक मंच मुंबई शाखा ता.वैजापूर जि.औंरगांबाद येथे लोक कलावंत महोत्सव व राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न झाला.सदर कार्यक्रमात लोककलावंत राष्ट्रीय अध्यक्ष गायक,गीतकार,संगीतकार,विष्णूआण्णा शिंदे मुंबई। यांचे प्रधान करणेत आला.
सकाळी कलावंताची वैजापूरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर,आण्णाभाऊ साठे,म कवी वामनदादा कर्डक, महाराणा प्रताप यांचे पुतळ्यास हार अर्पण करून फेरी काढण्यात आली.वैजापूर नगराअध्यक्षा सौ,शिल्पाताई परदेशी ,माजी आमदार,भाऊसाहेब पाटील चिटगावकर,शाहीर अशोक जी.बागुल.रविद्र आप्पा साखरे,व मान्यावर लोककलावंत यांचे हस्ते उद्धाटन करणेत आले.
वैजापूर लोककलावंत शाखेच्या वतीने मान्यावरांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आला.तसेच साहित्य,कला,शाहिर,शिक्षण,सामजिक, वैदयकीय,विविध संगीत कलाकार यांना पुरस्कारानं सन्मान करण्यांत आला तसेच सांयकाळी भिभगीतांचा कार्यक्रम करणेत आला.सदर कार्यक्रमात विविध शाहिरांनी आपल्या रचना सादर केल्या.स्वागत रविद्र साखरे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रमोद पठारे यांनी केले.
कार्यक्रमासाठी आबासाहेब जेजूरकर,आण्णासाहेब ठेंगडे,रामराव बागुल,जे.के बोरके,दिपक त्रिभूवन,पारस पठोरे ,संतोष जाधव,रामदास जाधव,संजय बागुल,कोशाबाई थोरात,पंचशिला धन्नेश्वर,कमलाबाई वाघ,साळवे आप्पा,गोपाळ बोर्डे औरंगाबाद,विलास पगारे यवला यांच्यासह मंचामधील सर्वच कराकारांनी परिश्रम घेतले.