दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर व नवीन कौठा नांदेड च्या वतीने दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मातोश्री स्व. सौ.सुलोचनाताई गुरुनाथराव कुरुडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कुसुम सभागृह व्ही.आय.पी. रोड नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाई गुरुनाथराव कुरुडे ( संस्था सचिव तथा माजी आमदार ) तर प्रमुख पाहुणे म्हणून जयश्रीताई पावडे ( महापौर नांदेड ) , डॉ. गोविंद नांदेडे ( शिक्षण तज्ञ ,माजी संचालक शिक्षण विभाग पुणे ), प्रशांत दिग्रसकर ( शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड ) प्रमुख उपस्थिती डॉ.पुरुषोत्तम धोंडगे ( संस्था अध्यक्ष ) , प्रा. वैजनाथराव कुरूडे ( अध्यक्ष संयोजन समिती तथा संस्था सदस्य ), मधुकरराव कुरुडे ( शालेय समिती सदस्य ) , हनुमंत भोपाळे ( प्र।प्राचार्य शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर ), तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. वैजनाथ कुरुडे , उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक सुधीर कुरुडे , सचिव सूर्यकांत कावळे ,उपप्राचार्य परशुराम येसलवाड , प्राथमिकचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले , उप मुख्याध्यापक देविदास कदम , इंद्रजीत बुरपल्ले ( शालेय समिती सदस्य ) , पर्यवेक्षक सदानंद नळगे शिवराज पवळे , माधव ब्याळे , प्रा. मुरलीधर घोरमांड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिला गट पाचवी ते आठवी साठी विषय “महापुरुषांना घडवणारी आई ” प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 2001 रुपये तर द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास 1501 रू. पारितोषिक ठेवण्यात आले होते त्यात प्रथम क्रमांक निरज शैलेंद्र कुमार वडगावकर ( महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेड ) तर राधा दिगंबर वानखेडे ( दीनदयाळ माध्यमिक विद्यालय बेट सांगवी ) तृतीय क्रमांक संस्कृती शिवलिंग मठपती ( श्री शिवाजी हायस्कूल सोनखेड ) या विद्यार्थिनीचा आला असून दुसरा गट नववी ते बारावी साठी विषय ” राष्ट्र निर्मितीमध्ये महापुरुषाचे योगदान ” प्रथम येणाऱ्या स्पर्धकास 3001 रुपये तर द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास 2001 पारितोषिक ठेवण्यात आले होते यात प्रथम कुमारी वेदांती वसंतराव जरीकोटे दिग्रसकर ( गुजराती हायस्कूल नांदेड ) तर द्वितीय क्रमांक ऋतुजा दीपक पाटील ( संत ज्ञानेश्वर महाराज उच्च माध्यमिक विद्यालय लोहा ) तृतीय क्रमांक धनवटे प्रतिभा दिलीप ( संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालय लोहा ) यांना प्राप्त झाले आहेत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम धोंडगे ” स्वतःच्या अंगावरचे दागिने देऊन शाळा , महाविद्यालय टिकवणारी आई म्हणजे सुलोचना आई होय ” अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर बोलताना नांदेडच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी उद्याच्या उज्वल भविष्यासाठी व समाजासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे काळाची गरज आहे असे उद्गार काढले. पुढे बोलताना डॉ. गोविंद नांदेडे साहेब यांनी उत्तम वक्तृत्व असणारी माणसं भाई डॉ. केशवरावजी धोंडगे , प्र.के.अत्रे , शरद जोशी , शिवाजीराव भोसले यांची भाषणे वक्तृत्व वाढवण्यासाठी आवश्य ऐकली पाहिजेत तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र शिकवत असताना जीवन शास्त्र हेही शिकवावे. वर्गात शिकवणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी ही देशाचे खरे नायक असतात. असे मार्गदर्शन केले. श्रीमती स्व.सौ. सुलोचनाताई कुरुडे यांची कन्या विजयाताई कुरुडे यांनी आपल्या आई विषयी लहानपणीचे विचार मांडताना भावना विवश होऊन जुन्या आठवणी ताज्या केल्या.
या स्पर्धेसाठी एकूण 35 शाळांनी सहभाग नोंदविला असून पहिल्या गटात 39 तर दुसऱ्या गटात एकूण 53 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेत खेड्यापाड्यातील शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले होते. छोट्या गटासाठी परीक्षक म्हणून प्रा. महेश मोरे , कु. सुवर्णा कळसे तर मोठ्या गटासाठी प्रा.धाराशिव शिराळे व स्वाती कान्हेगावकर यांनी काम पाहिले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.रूपाली कळसकर , डॉ. कविता तिर्थे , शिवराज पवळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली व आभारानंतर प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांनी ढोल ताशा च्या तालावर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.