दैनिक चालू वार्ता मुक्ताईनगर प्रतिनिधी -सुमित शर्मा
(मुक्ताईनगर) : आज दी.०८/०९/२०२२ वार गुरुवार ला मानव संसाधन विकास योजने अंतर्गत ० ते ५ किलोमिटर पर्यंतच्या मुलींसाठी मोफत सायकल वाटप कार्यक्रम स्व. अशोक फडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आला या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना महिलांचे सशक्तीकरण हेच आमचे ध्येय असे भारताचे प्रधान मंत्री नरेंद्रजी मोदी यांचे आदर्श समोर ठेवत प्रतिपादन बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके यांनी केले.ज्या प्रमाणे बेटी बढाव बेटी पढाव ही संकल्पना पूर्ण भारतभर यशस्वीरित्या ठरली .तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केले व शाळा काढल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण जोपासले पाहिजे. त्यांनी आपल्या विचारात मार्गदर्शन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर बि.डी .धाडी साहेब यांनी विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले तसेच मुलींमध्ये जीवन कौशल्य विकसित व्हावे हे त्यांनी मार्गदर्शन केले. या सायकल वाटप कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शिवलकर सर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, सदस्य दामू अण्णा सुरंगे, विनोद पाटील, गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर बि.डी .धाडी साहेब, केंद्रप्रमुख पाठक साहेब, भोसले साहेब, मुख्याध्यापक व्ही एस चौधरी सर, जोशी सर,जूनगरे सर,सर्व शिक्षक यांच्या हस्ते ५१ सायकलींचे वाटप करण्यात आले.