दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे नवे अतिरिक्त कारभारी म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. अरुण देवकर यांची नियुक्ती करण्यांत आली आहे. माननीय जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी त्यांची गुरुवारी नियुक्ती केल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेतील व जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे स्वागत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे काहीच दिवसापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये बदली झाली होती त्यानंतर हे पद रिक्त होते माननीय पोलीस अधीक्षकांनी श्री. धुमाळ यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची नियुक्ती केली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासनांमध्ये चांगलीच ओळख आहे. यावेळी दैनिक चालू वार्ता चे प्रतिनिधी श्री. पुरीगोसावी यांनी सोशल मीडियावरुन पोलीस निरीक्षक श्री.देवकर साहेबांचे अभिनंदन केले.