दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-गुरुवार दि.९ सप्टेंबर २०२२ ला दुपारी 3 वाजता वीज पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सालई बोबदो येथील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मृतक देवराज धंन्नालाल दर्शिंबे वय वर्षे ३८ रा.सालाई येथील रहिवासी आहे.या घटनेची माहिती स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची तसेच संबंधित मृतक व्यक्तीची माहिती घेतली.मेळघाटात विजेच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असल्याची नोंद आहे.दुपारच्यावेळी आकाशात खारी व सालाई भागांत विजांचा कडकडाट सुरु असता शेतकरी देवराज धंन्नालाल दर्शिंबे शेतातून घरी येत असता त्याच दरम्यान दोन गावांच्या मध्यभागी अचानक वीज पडून देवराज धंन्नालाल दर्शिंबे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.