दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
कोरेगांव तालुक्यात घरगुती बाप्पांना निरोप देण्यांत आला अनेक ठिकाणी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. मोठ्या जल्लोषांत आणि उत्साहीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला !अशा जयघोषाने परिसर चांगलाच दुमदुमून गेला होता. पोलीस प्रशासनांचे नियम पाळत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या घरगुती बाप्पांना निरोप दिला. शुक्रवारी सकाळपासून ठीक ठिकाणी तळ्यावरती अनेक गणेश भक्तांनी आपल्या माता बहिणी व परिवारांसह गर्दी दिसून येत होती. उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र आणि जिल्हास्तरीय पत्रकार म्हणून ओळख असणारे श्री.पुरीगोसावी यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला परिवारांच्या उपस्थिंतीमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने व बाप्पा तुमची सेवा करीत असताना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून काही चूक झाली असेल तर मी तुमची क्षमा मागतो असे म्हणत पत्रकारांनी लाडक्या फेटेवाल्या मानाच्या आपल्या निवासस्थानी असणाऱ्या लाडक्या
बाप्पाला निरोप दिला. यावेळी हनुमंत भिलारे, विष्णू भिलारे,यश गोसावी,भरत गिरी, संभाजी गोसावी सारिका गिरी, विमल गोसावी, आदीं गणेश भक्तांची यावेळी उपस्थिती होती.