दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक डॉ. चेतन नरके हे दिल्लीत होणाऱ्या डेअरी शिखर संमेलनाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच ते महाराष्ट्रातून पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या वतीने १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे जागतिक डेअरी शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . या संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी जगभरातील ४० तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे . या तज्ज्ञांमध्ये डॉ . चेतन अरुण नरके यांचा समावेश आहे . ‘ डेअरी उद्योगातून निर्माण झालेले ग्रामीण संपूर्ण देशातील दूध उत्पादक शेतकरी गटातून इंडियन असोसिएशनच्या संचालक पदी निवड डेयरी झाली आहे . दरवर्षी आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या वतीने डेअरी उद्योगातील सर्व घटकांच्या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते . यावेळी संमेलनाचे यजमानपद भारताला मिळाले आहे . संमेलनात जगभरातून सुमारे २५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत . सुरक्षित आणि शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवीनतम संशोधन निष्कर्ष , डेअरी प्रक्रिया , पॅकेजिंग , विश्लेषण , पशू आहार आणि आहार घटक , डेअरी पशू प्लांटमधील संबंधित उपयुक्तता , विभागांच्या क्षेत्रातील नवीनतम नवकल्पना , अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक अर्थाने जागतिक डेअरी क्षेत्राशी संबंधित अनुभवांचे प्राप्त करण्याची संधी ज्ञान या संमेलनातून उपलब्ध होणार आहे .भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थ चक्र ‘ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत . जागतिक स्तरावर दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन करणारे व सध्या नरके हे गोकुळच्या इतिहासातील पहिलेच संचालक ठरले आहेत , यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे नाव होत आहे त्यांच्यामुळे शिखर तांत्रिक परिषदेत संमेलनातील मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देखील पहिल्यांदाच मिळाले आहे . डॉ . नरके पूर्व आशियातील नामवंत अर्थतज्ज्ञ आहेत . तसेच थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत . अशी माहिती दैनिक चालू वार्ताला युवराज पाटील यांनी दिली.