दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय टेंभुर्णी रोड अहमदपूर येथे जागतिक सांकेतिक भाषा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सांकेतिक भाषा दिन निम्मित जनजागृती रॅली काढण्यात आली.शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषा दर्शवणारी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सांकेतिक भाषेतील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. कर्णबधिर मुलांनी माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर मनोगत व्यक्त केले.त्याच बरोबर स्पीच थेरपिष्ट मोहिनी पाटील यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. विशेष शिक्षकांनी मुलांना व पालकांना सांकेतिक भाषेचे महत्व पटवून सांगण्यात आले.कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास उमाकांतराव तपशाळे यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून श्री बिरादार सर,आगलावे सर ,संजय पाटील सर,श्री आलट सर, पराड सर,म्हेत्रे सर, बोरोळे सर,वानखेडे सर,मेश्राम सर , साळी सर,पाटील मॅडम,कांबळे मॅडम,पवार मॅडम,देशमुख,पांचाळ,स्वामी, त्याच बरोबर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.