
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
लोहा:-
सोनखेड येथील प्रसिध्द स्पेशल आलु बिर्याणी व खिचडी लोहा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पालम रोड लोहा. येथे हॉटेल श्री चिंतामणी शुध्द शाकाहारी चा. भव्य शुभारंभ पार पडला. लक्ष्मी पुजन निमित्त दि.४/११/२०२१ रोज गुरुवारी सकाळी १० वा. भव्य उदघाटन करण्यात आले. श्री. शरद पा. पवार (उपनगराध्यक्ष न.पा.लोहा. तथा भाजपा ता. अध्यक्ष, लोहा.) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश पा. हिलाल (शिवसेना तालुका प्रमुख, लोहा.),श्री. बाबाराव पा. गवते (भाजपा तालुका अध्यक्ष किसान सेल, लोहा.) श्री. खुशाल पा. पांगरीकर (मा.सभापती पं.स., लोहा.) यांची प्रमुख उपस्थिती होती.विशेष म्हणजे आलू बिर्याणी ,खिचडी,पपडी,भजे ,मसाला पापड हे सर्व पदार्थ फक्त 10 रुपये मध्ये व चहा 5 रुपये मध्ये उपलब्द असेल असे हॉटेल चे मालक मारोती विठ्ठलराव टेकाळे यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी दैनिक चालु वार्ता चे संपादक डी.एस.लोखंडे सर ,शिवाजी नगर पुणे प्रतिनिधी दत्ता पवार सर,महाराष्ट्र कार्यकारी उपसंपादक भरत पवार सर,गोविंद पवार उपस्थित होते.