दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी-
चापोली : दि.२९(प्रतिनिधी)
येथील संजीवनी महाविद्यालयातील प्रा. अमोल केंद्रे यांना नुकताच राज्यस्तरीय मराठवाडा सम्राट नेता हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्धल संजीवनी महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी युवा सम्राट मित्र मंडळ (महाराष्ट्र) वतीने आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय मराठवाडा सम्राट नेता पुरस्कार देण्यात येतो. २०२१ – २२ या वर्षीचा पुरस्कार चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी महाविद्यालयातील प्रा. अमोल केंद्रे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना देण्यात आला आहे.
या निमित्त संजीवनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे यांच्या हस्ते प्रा. अमोल केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था सचिव डॉ. भालचंद्र चाटे, कनिष्ट महाविद्यालायचे उपप्राचार्य रमेश गुट्टे, प्रा. बजरंग केंद्रे, प्रा. शंकर डोंगरे, प्रा. नारायण निलापल्ले, प्रा. जयचंद भताने, प्रा. डॉ. फुलचंद चाटे, प्रा. डॉ. अतुल धावारे, प्रा. डॉ. माधव कागणे, प्रा. चंद्रकांत कदम, प्रा. विजय गुळवे, प्रा. नामदेव नलवाड, प्रा. महेंद्र कुलकर्णी, प्रा. आर. डी. केंद्रे, प्रा. अण्णाराव केंद्रे, प्रा. नारायण खेडकर, प्रा. मनोज मुंढे, प्रा. नितीन आवस्कर सह आदी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.