दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
कंधार/लोहा
बालाजी मंदिर भवानीनगर कंधार येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रा. बचाटे डी.जी., यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षापासून पदयात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात जात असते .त्याप्रमाणे यावर्षीचीही पदयात्रा मोठ्या भक्तीमय आणि उत्साहामय वातावरणात मार्गस्थ झाली. ही पदयात्रा भवानीनगर कंधार, नवघरवाडी, पानभोसी,आंबेसांगवी, सोनखेड, जानापुरी, वडेपुरी मार्गे रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी पोहोचली. सोनखेड येथे गोपाळकृष्ण मोरे यांच्या वतीने पदयात्रेतील भाविकांना सोनखेड येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रत्नेश्वरी गडावर इंजि. एम .एन .डांगे यांच्या वतीने पदयात्रेतील भाविकासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी नारायण बनसोडे , गणेशराव अमिलकंठवार,
मारोतराव सुर्वणकार, हनमंतराव मेहेकरकर ,गोपालकृष्ण मोरे आदींनी परिश्रम घेतले. पदयात्रेमध्ये कंधार ,नवरंगपुरा, बामणी, फुलवळ आदी भागातील महिला, पुरुष भक्तगण सहभागी झाले होते.