दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
ग्रा.पं च्या पहिल्याच निवडणुकीत दमदार सुरुवात
जव्हार:- येत्या १६ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिजाऊ संघटनेने दमदार सुरुवात केली असून तब्बल २० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे यांचे प्रखर नेतृत्व आणि पालघर जिल्हाध्यक्ष मधुकर खुताडे यांनी या निवडणुकीत नियोजनबद्ध केलेली उमेदवारांची योग्य निवड तसेच संघटनेने तालुक्यात आतापर्यंत केलेली लोकपयोगी कामे आणि जनतेचा असणारा संघटनेवर विश्वास यामुळेच हे शक्य झाल्याचे तालुकाध्यक्ष मधुकर पवार यांनी सांगितले.
निवडून आलेल्या बिनविरोध सदस्यांमध्ये घिवंडा-४,बोराळे-१,भूरीटेक-५,विनवळ-३,पाथर्डी-१,हिरडपाडा-१,पिंपळशेत-१,हातेरी-४ अशा आठ ग्रामपंचायतीमध्ये जिजाऊ संघटनेच्या वीस सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.या सार्वत्रिक निवडणुकीत जिजाऊने पहिल्यांदाच पूर्ण ताकतीने उतरून पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायत निवडणुकीत वीस बिनविरोध सदस्यांच्या रूपाने विजयाची सुरुवात केली असल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.