दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
वडेपुरी गड :– नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र माता रत्नेश्वरी मंदिर देवस्थानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री. ह. भ. प. रंगनाथ महाराज ताटे पोखरभोसीकर यांच्या मधूर वाणीतून काल्याचे किर्तन संपन्न झाले. दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली असून नांदेड, कंधार, लोहा तालुक्यातील भाविक भक्त माता रत्नेश्वरी गडावर येऊन काल्याचे किर्तनाचा व माता रत्नेश्वरी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला .