दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव पाटील गायकवाड
कंधार :- कंधार व लोहा तालुक्याचे श्रद्धास्थान श्री. क्षेत्र कलंबर खुर्द येथे श्रीमंत योगीराज निवृत्ती महाराज व श्री. ह. भ. प. मोतीराम महाराज यांच्या मंदिराच्या कळसाचे आणि दोन्ही महान संताच्या मुर्ती स्थापना सोहळा दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करून हा सोहळा भव्य दिव्य साजरा होणार आहे. त्यासाठी कलंबर खुर्द गाव आणि पंचक्रोशीतील समीती लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. या सोहळ्यास पंढरपूर, देहू, आळंदी, पुणे येथील ह. भ. प. महाराज, किर्तनकार, मंत्री, खासदार, आमदार, दैनिक चालू वार्ता पुणे चे मुख्य संपादक श्री. डि. एस. लोखंडे पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, पंचक्रोशीतील बाईलेकी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. माजी शिक्षण संचालक श्री. गोविंद नांदेडे साहेब यांनी दैनिक चालू वार्ताचे पत्रकार बाजीराव पाटील यांना माहिती दिली असून पाच हजार भक्त बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.भव्य मंडप, आतिषबाजी, भव्य शोभायात्रा, भजनी मंडळ आमंत्रित मंगल कळश, विविध संत,महंत देखावा असणार आहे.नांदेडे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.जय्यत तयारी कशी करायची यावर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. संभाजी महाराज, श्री. रावसाहेब पाटील भोपाळे, श्री. सुरेश पाटील घोरबांड सर, श्री. सोपान पाटील घोरबांड, श्री. प्रभाकर पाटील घोरबांड, श्री. धारोबा गुंडे (मा.सरपंच), श्री. विठ्ठल कऊटकर, श्री. माधव पाटील, श्री. व्यंकटराव घोरबांड, श्री. दुबाजी गुंडे, श्री. सुभाष निळकंठे, श्री. शिवाजी घोरबांड, शंकर पाटील घोरबांड, प्रल्हाद पाटील घोरबांड,श्री. संभाजी कोठेवाड उपस्थित होते.